
किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा पूर्ववत; जिल्ह्यातील सागरी पर्यटनही पुन्हा सुरू
अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व सागरी पर्यटन गेले दहा दिवस ठप्प होते. आता समुद्रातील वादळ शांत झाले असून, वातावरण पूर्वपदावर आले आहे.त्यामुळे बंदर विभागाकडून लावण्यात आलेला धोक्याचा तीन नंबर बावटा उतरविण्यात आला असून, किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा व सागरी पर्यटन रविवार, 2 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. याबाबतची माहिती मालवणचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सद्यस्थितीत हवामान चांगले असल्यामुळे गेले दहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक, वॉटर स्पोर्टस्, पॅरासिलिंग पर्यटन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.




