आंबोलीत पर्यटकाला गाडी अडवून लुटले

आंबोली दि.१४-: कोल्हापूरमधील पर्यटकाची गाडी अडवून लुटण्याची घटना आंबोली येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.गोवा दर्शन करून हे पर्यटक कोल्हापूरला जात असताना आंबोली नांगरतास येथे जंगलमय भागात लुटणाऱ्या टोळीने गाडी अडवली. गाडीतील १ लाख ९० हजारांची रोकड व दागिने लुटले. ही घटना काल सायंकाळी घडली. या प्रकरणी पर्यटकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तपास काम सुरू आहे.

Related Articles

Back to top button