
सुट्टीसाठी गावात आलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू
मुंबईतून सुट्टीत गावात आलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांच्या घराच्या बांधकामावर पाणी मारत असता विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला क्षितिज शांताराम शितप या मुलाचे नाव आहे .हा मुलगा मुंबईत डोंबिवली येथे राहतो. सुट्टी असल्याने तो गावात आला होता यांच्या काकांच्या घराचे बांधकाम चालू होते त्यासाठी तो पाणी मारत होता पाणी मारत असता अचानक वायर तुटली यामुळे पंप बंद पडला तो चालू करण्यासाठी जात असता वायरचा शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.हा प्रकार गुहागर तालुक्यातील साखरी बुद्रुक गणेशवाडी येथे घडला.