
रत्नागिरी येथे ८० CNG घंटागाड्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांच्या हस्ते लोकार्पण.
आज स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागरी सुविधा योजना अंतर्गत ८० CNG घंटागाड्यांचे लोकार्पण व शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप कार्यक्रम मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
*शेतकऱ्यांसाठी दिलासा –* शेतकऱ्यांना मोफत गुणवत्तापूर्ण बियाणे वाटप करण्यात आले, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढेल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
*ऊर्जेची बचत – पर्यावरणपूरक विकास:* ग्रामपंचायतींमधील स्ट्रीट लाइट्सची विजेची बिलं कमी करण्यासाठी दरवर्षी ८ कोटींचा खर्च करत १ वॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प हाती घेण्यात आला. गोळप गावात प्रकल्प सुरू झाला आहे. गुहागर तालुक्यातील प्रकल्प एका वर्षात पूर्ण होणार असून, पुढील टप्प्यात खेड येथे प्रकल्प उभारले जाणार असल्याचं सांगितले.
डिजिटल क्रांती – स्मार्टफोन वाटप:* रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील CRP ना मोफत स्मार्टफोन देण्याचा निर्णयही यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. असे अनेक प्रकल्प हे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून सुरू केलं असल्याचं यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण भैय्या सामंत, माजी आमदार राजन साळवी, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.