
फटाके फोडून प्रदुषण करु नका :अभिनेते वैभव मांगलें
मुंबईत हवेच्या पातळीच्या गुणवत्तेत घट झालीय. मुंबईत हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे सगळ्यांच्या चिंतेत वाढ झालीय.याविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले आहेत.त्याअनुषंगाने दिवाळीकाळात सायंकाळी सात ते दहादरम्यानच फटाके फोडावे. अशातच अभिनेते वैभव मांगलेंनी या प्रकरणावर सोशल मीडियावर भाष्य केलंय.अभिनेते वैभव मांगलेंनी याविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहीली आहे. वैभव मांगले लिहीतात, “कळकळीची विनंती …..मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हवा कमालीची प्रदूषित आहे .कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करू नका.”
अशाप्रकारे वैभव मांगलेंनी सोशल मीडियावर त्यांचं मत व्यक्त केलंय. या मतावर अनेकांनी समर्थन केलंय तर काहींनी नाराजी दर्शवली आहे.
www.konkantoday.com