
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री सरसावले
रत्नागिरी जिल्ह्यात विविध भागात झालेल्या पाणीटंचाईचा आढावा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी येथील खास बैठकीत घेतला. काही गावात व वाड्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाण्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये असे आदेश त्यांनी दिले यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असे त्याने सांगितले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असेही आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले .जी गावे यावेळी टँकरग्रस्त यादीत आहेत ती पुढील वर्षी टँकरमुक्त करू या असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले .दापोली येथील नारा गोली धरणातील गाळ उपसा चे काम लोकसहभागातून पूर्ण झालेल्या ग्रामस्थांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे त्यानी सांगितले.