दूषित बर्फ पुरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा पालकमंत्र्यांचे आदेश
दूषित बर्फ वापरल्याने आजाराच्या साथी आल्या असून अशा प्रकारे दूषित बर्फाची निर्मिती करणाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहेत. उन्हाळ्याच्या काळात बर्फाला मोठी मागणी असल्याने उपलब्ध होणारा कोणताही बर्फ वापरला जात आहे. दापोली येथे माशासाठी वापरले जाणारे बर्फ गोळेवाले व्यापाऱ्यांनी वापरल्याने दापोलीत काही भागात साथी पसरल्या असून त्याचीलागण सदतीस जणांना झाली होती.त्यानंतर प्रशासनाने बर्फ निर्मिती करणाऱ्या चार कारखान्यांवर कारवाई केली होती. दूषित बर्फ निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर आवश्यकता भासल्यास फौजदारी कारवाई करावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.