
चोरांना ऐवज मिळाला नाही म्हणून मोटरसायकल चोरून नेली
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड भडगाव येथे मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला दोन फ्लॅट पाच बंगले फोडले .चोरट्यांच्या टोळीने मयुरेश अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून संदीप सावंत व यशवंत मेंदरकर यांचे बंद फ्लॅट फोडले घरातील कपाटे फोडून यामध्ये ऐवज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही.दरम्यान या इमारती खाली असणारी बबन जाधव यांची मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली दरम्यान या परिसरात असलेल्या आनंदनगर भागातील पाच बंगले चोरटय़ांनी फोडले परंतु तेथेही त्यांना कोणताही ऐवज मिळाला नाही.