
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
रत्नागिरी- विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशिन रेल्वे ट्रॅकवरून घसरले.युटिव्ही असं मशिनचं नावं, यामुळे मुंबईकडून येणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना ब्रेक लागला आहे.
रत्नागिरी जवळच्या भोके गावाजवळची ही घटना आहे.मशिन घसरल्याने एक तासापासून कोकण रेल्वेची वाहतुक ठप्प.मशिन रेल्वे ट्रॅकवर आणण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
लवकरच मार्ग सुरळीत होईल- कोकण रेल्वे प्रशासनाचा दावा.