
केरळमध्ये मान्सून दोन दिवस उशीरा दाखल होणार, महाराष्ट्रातही पुढील ४-५ दिवस मान्सून पूर्व पाऊस पडणार
दरवर्षीप्रमाणे केरळमध्ये मान्सूनचं१ जूनला होणारं आगमन यंदा लांबलं आहे. आता दोन दिवस उशीरा म्हणजे ३ जूनला केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह १ जूनपासून जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसात केरळात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही पुढील ४-५ दिवस मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
. कोकणात मान्सून १० जूनला दाखल होईन तर मुंबईत १२ पर्यंत पोहचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
www.konkantoday.com