
भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्या आहेत,आता भरती नाही-मुख्यमंत्री
अमरावती/ प्रतिनिधी
भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत इतर पक्षांतून येणार्या नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्या आहेत. आता भरती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.
आज अमरावतीतून ‘महाजनादेश’ यात्रेला सुरुवात करून भाजपने विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीतून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे.