
तब्बल ११ दिवसानंतर कमलाकर मसूरकर यांचे उपोषण स्थगित
तब्बल ११ दिवसांनी देवरूख येथील कमलाकर मसूरकर यांनी उपोषण स्थगित केले. त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासनाने अटींची पूर्तता न केल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे कमलाकर मसूरकर यांनी सांगितले.महाराष्ट्र औद्योगिक समूह विकास योजना अंतर्गत एमआयडीसी साडवली, ता. संगमेश्वर येथे उभारलेले सामूहिक सुविधा केंद्र मार्च २०१९ ला कार्यान्वित होणे आवश्यक होते. परंतु विकास (उद्योग) यांना मशिन चालू करून देण्याबाबत वारंवार संपर्क करून सुद्धा अद्याप चार पाच वर्षांचा कालावधी लोटून देखील मशिनरी सुरू नसल्याने उद्योग सुरू होवू शकला नाही. याचा मोठा आर्थिक भुर्दंड समूह कंपनीला सोसावा लागत आहे. आता हा आर्थिक भार डोईजड झाल्यामुळे आणि शासन प्रशासन दुर्लक्ष करत आपल्याला न्याय मिळावा यासाठी सामूहिक सुविधा केंद्राचे अध्यक्ष कमलाकर गोपाळ मसुरकर हे शुक्रवार दि. ९ रोजीपासून आमरण उपोषणाला देवरूख येथे बसले होते.www.konkantoday.com