
हर्णैतील तरूणांची ना. रविंद्र वायकर यांच्याकडून विचारपूस
दापोली ः ऐन उन्हाळ्यात हर्णै, पाजपंढरी परिसरात टायफॉईड व डेंगु सदृश्य साथ आली असून १४ रूग्णांवर दापोली उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका रूग्णाला मुंबईत हलविले आहे. या सर्वांची पालकमंत्री ना. रविंद्र वायकर यांनी उपजिल्हा रूग्णालयात भेट घेवून विचारपूस केली असून प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. तापाचे या भागामध्ये आणखी रूग्ण आहेत का याचा सर्व्हे करण्यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून दोन पथके नेमण्यात आली आहेत.