
शेतकर्यांच्या आंब्यासाठी मनसे रस्त्यावर
चिपळूण ः काकेणातील शेतकर्याला मारहाण करून कोकणचा राजा हापुसला मुंबईमध्ये जागा न देणार्या भाजपच्या उन्मत्त नेत्याला धडा शिकविण्याबरोबर मुंबई, पुणेमध्ये हक्काची जागा निर्माण करण्यासाठी, ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कोकणातून मनसेचे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी, आंबा व्यापारी सहभागी होणार आहेत. १७ मे रोजी ठाणे येथे हा मोर्चा निघणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.