
बेंजो पार्टीतील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
मित्राच्या लग्नासाठी मुंबईतून बेन्जो पार्टी ग्रुप घेऊन आलेल्या ग्रुपमधील एका तरूणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. लांज्याजवळील पनोरे गावातील मोरये हे नोकरीनिमित्त मुंबईत राहतात त्यांचे गावातलग्न असल्याने आपल्या मुंबईतील मित्राला बेंजो पार्टी सांगितली होती.हे सर्वजण नदीवर आंघोळीसाठी गेले होते.यातील मनोज वामन राणे नदीवर आंघोळ करीत असता त्याला चक्कर आली व तो नदीच्या पाण्यात पडला आरडा ओरड झाल्यावर त्याला नदीतून बाहेर करण्यात आले व उपचारासाठी साठवली येथे नेण्यात आले परंतु हे आरोग्य केंद्र बंद असल्याने लांजा येथे नेण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.