एकतर्फी प्रेम प्रकरणावरून तरुणीवर धारदार चाकूने वार व तरुणाची आत्महत्या

दोडामार्ग दि.१३-: प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या गैरसमजातून प्रेयसीच्या अंगावर धारदार चाकूने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केल्यानंतर त्यात चाकूने स्वतःवर वार करून आत्महत्या करणारा प्रियकर गोकुळदास रावजी काळकेकर वय 25 याच्यावर सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात वझरे काळकेकरवाडी येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. तर चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या अल्पवयीन युवतीवर बांबुळी गोवा येथे रविवारी रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली असून अद्यापही तिची अवस्था गंभीर असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Back to top button