२४२ दिवसाच्या गणपतीचे वेंगुर्ल्यात वाजत गाजत विसर्जन

0
454

वेंगुर्ले,ता. १३ :वेंगुर्ले येथे काल रविवारी सायंकाळी २४२ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाची मिरवणूक बाजारपेठेतून काढण्यात आली. यावेळी असंख्य भाविकांनी या गणतीचे दर्शन घेतले.
वेंगुर्ले, कुबलवाडा-एकमुख दत्तमंदिरानजिकचे गुंडू दामले यांच्या निवासस्थानी २४२ दिवस गणतीचे पूजन करण्यात आले होते. गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या या गणपतीला रविवार २४२ दिवस पूर्ण झाले. सायंकाळनंतर ढोल ताशांच्या गजरात बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी या गणपतीचे दर्शन घेतले. नंतर पाणवठ्यावर गणपतीचे विसर्जन करण्यात आले.