रत्नागिरीतील बर्फ उत्पादकांवरही प्रशासनाची करडी नजर

0
284

चिपळूण ः बर्फ उत्पादन घेताना गलिच्छपणा दिसून आल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने रत्नागिरीतील सहाजणांविरूद्ध कडक कारवाई केली असताना आता या विभागाने आपली मोहीम उत्तर रत्नागिरीकडे वळविली आहे. त्यामुळे रत्नागिरी पाठोपाठ आता दापोली, चिपळुणातील उत्पादकांवर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे.

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे बर्फाच्या कारखान्यात अस्वच्छता आढळून आल्याने तब्बल सहा कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कडक कावाई केली होती.