कान्हे-पिंपळीतील विवाहिता बेपत्ता

0
277

चिपळूण ः कान्हे-िंपंपळी येथील वरचीवाडीतील विवाहिता १ मेपासून बेपत्ता असून याबाबत रविवारी येथील पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

सौ. सिद्धी राजेश जाधव (२१), असे या विवाहितेचे नाव आहे. या गुरूवारी सकाळी ६.३० वा. कामावर जाते असे सांगून घराबाहेर पडल्या. त्यानंतर अद्याप घरी परतलेल्या नाही. त्यानुसार बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली असून याबाबत अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.