
सावर्डे येथे जमिनीच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील व्यापारी गणेश तुकाराम कोकाटे यांच्या डोक्यात सुनील सीताराम जाधव याने लोखंडी पार्क मारून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे .कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत कोकाटे हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांच्या शेजारील सुनील जाधव याने वाद निर्माण करून त्यांना मारहाण केली व दुकानातील सामानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली .याबाबत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.