
रुंदीकरणात बुजलेली गटारे पावसापूर्वी साफ करावेत दाभोलकर यांची मागणी
चिपळूण कराड या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे खेर्डी बाजारपेठेतील दोन्ही बाजूची गटारे भरून गेली आहेत.पावसाळ्यात याचा फटका व्यापारी यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत पाणी साठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासाठी याची तातडीने दखल घेऊन गटारे मोकळी करावीत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर यांनी केली आहे.