
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसरातील बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय चोरट्यांनी फोडले
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसरातील बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय चोरट्यांनी फोडून ४० हजार रुपये चोरून नेले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रसाद प्रभाकर वाघमारे (५५, रा. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे मारूती मंदिर परिसरातील विष्णूपंत जांगळेकर संकुल येथे ओमकार डेव्हलपर्स नावाचे कार्यालय आहे. १४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तसेच आतील ३६ हजार रुपये रोख, चार हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा व डिव्हीआर असा मिळून ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली. www.konkantoday.com