व्हॉटस्ऍप मॅसेजवरून पत्नीला मारहाण
चिपळूण ः सध्या व्हॉटस्ऍपवरील मॅसेजमुळे गैरसमज किंवा वाद झाल्याचे अनेक प्रकार घडतात. अशीच काहीशी घटना शहरातील खेंड बावशेवाडी येथे घडली असून याबाबत येथील पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. मात्र संबंधित पती पत्नीच्या नातेवाईकांनी हा प्रकार तडजोडीने मिटविला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पती हा सध्या मुंबईला रहात असून पत्नी गावी खेंड कोलेखाजण येथे रहात आहे. संबंधीत पतीने व्हॉटस्ऍपवर तू मुंबईला राहण्याच्या लायकीची नाहीस, असा मॅसेज पाठविला. त्यावर पत्नीने त्याला व्हॉटस्ऍपच्या त्याच्याच ग्रुपवर देताना तुझी लायकी आहे, तू मुंबईलाच रहा असा मॅसज टाकला होता. त्याचा राग आल्याने पतीने गावी येवून पत्नीला मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये पत्नीच्या पायाला दुखापत झाली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच संबंधित पती पत्नीच्या नातेवाईकांनी तडजोडीने हा प्रकार मिटविला.