ग्राम विद्युत व्यवस्थापक पदाकडे तरूणांची पाठ
रत्नागिरी ः गावातील विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गावात ग्राम विद्युत व्यवस्थापकांची निवड करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. मात्र गावागावात या भरतीकडे तरूणांनी पाठ फिरविली आहे. दोन वर्षात अद्यापपर्यंत महावितरण विभागाकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शासनाच्या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्युत महावितरण कंपनीमार्फत ग्रामीण भागात कर्मचारी कार्यरत आहेत. एका कर्मचार्याची अनेक गावांसाठी नियुक्ती आहे. ग्रामीण भागात वीज वितरणाचे मोठे जाळे पसरले आहे. अनेक गावांचा भार एका वायरमनवर असल्याने काही बिघाड झाल्यास संबंधित कर्मचायाला सेवा देताना अनेक अडचणी येतात. यामुळे ग्रामपंचायत स्तरावर विद्युत विषयक सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. यानुसार गावागावात ग्राम विद्युत सहाय्यकाची नेमणुक करण्यात येणार आहे.