न्यायालयाच्या निकालामुळे कोकण कृषि विद्यापीठातील पदवीदान समारंभ लांबणीवर

दापोली ः मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्यान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने १८ मे रोजी आयोजित केलेला पदवीदान समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीदान समारंभाचे १८ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र २४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा मत्स्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी देण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे मत्स्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी कशी द्यायची असा प्रश्‍न विद्यापीठ प्रशासनाला पडला आहे.

Related Articles

Back to top button