
तरूणाचा नदीत बुडून मृत्यू
लांजा ः कर्नाटक कारवार येथे राहणारा महंमद हवेरी या २१ वर्षीय तरूणाचा नदीच्या डोहात बुडुन मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना प्रभानवल्ली येेथे मुचकुंदी नदीच्या पात्रात घडली. यातील महंमद हवेरी हा कर्नाटक राज्यातील कारवार येेथे राहतो. त्याच्या बहिणीची लग्न प्रभानवल्ली येथे झाले आहे. बहिणीला सासरी सोडण्यासाठी महंमद हा प्रभानवल्ली येथे आला होता. उन्हाळी सुट्टी असल्याने तो तेथे थांबला होता. दुपारी तो आंघोळीसाठी म्हणून घरातून बाहेर पडला परंतु घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. अखेर शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह मुचकुंदी नदीच्या पात्रात तरंगताना आढळून आला.