रत्नागिरी ः रत्नागिरीजवळील पानवल येथे एस.टी. बसने दुचाकी चालकाला धडक दिल्याने सीताराम भायजे हे शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. झरेवाडीहून रत्नागिरीला जाणार्या बसने पानवलजवळ एका दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार सीताराम भायजे (रा. चोरवणे संगमेश्वर) हे शिक्षक जखमी झाले. भायजे यांनी हेल्मेट घातल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला नाही. मात्र छातीला मोठ्या प्रमाणावर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले.