फोर्बस अब्जाधीश उद्योगपतींच्या यादीत विनोद सराफ यांचा समावेश

0
276

रत्नागिरी ः फोर्बसच्या एशिया मासिकाने २०१९ च्या अब्जाधीज उद्योजकांच्या यादीत लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिकचे मालक विनोद सराफ यांच्या नावाचा समावेश आहे. या मासिकेच्यावतीने दरवर्षी अब्जाधीश उद्योगपतींची यादी जाहीर केली जाते. यावर्षी सराफ यांचे नाव यांचे नाव आल्याने लोटे महाड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची मान उंचावली आहे.
१९८९ साली विनती ऑरगॅनिक कंपनी सुरु झाली असून या कंपनीच्यावतीने स्पेशालिटी केमिकल बनवले जाते. जागतिक बाजारपेठेत या कंपनीचे नाव वरच्या स्थानावर आहे. गेल्या दोन वर्षात कंपनीने जागतिक स्तरावर प्रगती केली असून आंतरराष्ट्रीय बाजारात कंपनीची कॅप व्हॅल्यू १० हजार कोटी रुपये आहे. अमेरिका, जपान, युरोप आशिया खंडात या कंपनीच्या उत्पादनाची निर्यात होते. या कंपनीच्या उभारणीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. सराफ यांचे नाव प्रसिद्ध झाल्यावर उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.