जिल्ह्यात पाणी टंचाईची झळ जाणवु लागली

0
268

रत्नागिरी ः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. देवरूखसारख्या शहरातही आठवड्यातून तीनवेळा पाणी दिले जात आहे. त्या पाठोपाठ आता दापोलीतही आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे दापोलीकरांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. रत्नागिरी एमआयडीसीमार्फत रत्नागिरी नगर परिषदेच्या काही भागात व मिरजोळे, शिरगांव, मिर्‍या, नाचणे, कुवारबांव, पोमेंडी, कर्ला, आदी भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुढील साठ्याचे नियोजन करण्यासाठी एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात केली असून १३ मे पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.