जिल्ह्याचा अप्रतीम ठेवा असलेल्या कातळ शिल्पाबाबत शासन उदासीन
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेवा ठरलेल्या कातळ शिल्पाबाबत जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या कातळ शिल्पाना अतिशय महत्व आहे. या कातळ शिल्पाचे संवर्धन झाल्यास कोकणात येणार्या पर्यटकांना एक नवे दालन उपलब्ध होणार आहे.
याबाबत वेळोवेळी शासनाकडून घोषणा करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात त्याच्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. जिल्ह्यात १० ठिकाणी कातळशिल्पे असून रत्नागिरीतील सुधीर रिसबुड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी कातळशिल्पाची शोध मोहिम घेवून ही चित्रे उजेडात आणली. ही कातळशिल्पे राज्यात संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावीत यासाठीचा प्रस्ताव पुरातत्व विभागाच्यावतीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु वर्ष उलटूनही शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.