
तीस वर्षे फरार दरोडेखोरास ७ वर्षाची सक्तमजुरी
खेड तालुक्यातील शिव-मोहल्ला इब्राहीम अहमद परकार यांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकून तब्बल ३० वर्षे फरार असलेल्या शाम ब्रिंदावन कैथवास (जि. वाशिम, रा. सावरगांव) याला गतवर्षी जुलै महिन्यात पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी येथील दरोडेखोर शाम कैथवास याला येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. यात १ लाख रुपये दंडाच्या शिक्षेचाही समावेश आहे. हा गुन्हा १३ नोव्हेंबर १९९४ रोजी घडला होता.यातील दरोडेखोर शाम ब्रिंदावन कैथवास याने आपल्या साथीदारांसोबत ११ नोव्हेंबर १९९४ मध्ये शिव मोहल्ला येथील इब्राहीम अहमद परकार यांच्या घरी पहाटेच्या वेळी सशस्त्र दरोडा टाकला होता. इब्राहीम परकार यांना चाकूचा धाक दाखवत डोक्यात वार करून त्यांच्या घरातील सोन्याचे दागदागिने, किंमती घड्याळे व रोकड चोरून पलायन केले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात त्याच्यासह अन्य ५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. www.konkantoday.com