राजापूर शहरात घरफोडी, दोन लाखांचे दागिने चोरले.
राजापूर शहरातील सत्यवान कदम यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे दोन लाखांचे दागिने लंपास केले. सत्यवान कदम यांच्या या घरात त्यांचे नातेवाईक व भाडेकरू राहत होते .काही घरगुती कारणाने हे सर्वजण बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरावर डल्ला मारला.या घटनेची पोलिसांना खबर देण्यात अाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकही आणले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.