
ग्रामपंचायतीचा कर थकल्याने चेतक कंपनीची मालमत्ता जप्त करा -सदस्यांची मागणी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम ते खेरशेत दरम्यानच्या चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या चेतक कंपनीने कामथे ग्रामपंचायतीचा २० लाखांचा कर थकबला आहे. यासंदर्भात पाठपुरावा करूनही कंपनी व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नाही. ग्रामपंचायतीच्या नोटीसीला केराची टोपली दाखवणार्या या कंपनीच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करा, अशी मागणी संतप्त पदाधिकार्यांसह सदस्यांनी केली आहे. शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या प्रकरणावरून वादळी चर्चा झाली.
www.konkantoday.com