मत्स महाविद्यालयाला मिळणार पदवी देण्याचे अधिकार ? कोकणातच मत्स्य विद्यापीठाचा संभ्रम कायम.

रत्नागिरी – विद्यार्थ्यांच्या याचिकेवर निर्णय देताना नागपूर खंडपीठाने शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला पदवी देण्याचे अधिकार द्या अन्यथा दिलेल्या सर्व पदव्या रद्द करा असे आदेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सोमवारी आमदार उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन थेट शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून दिला.लोकसभेच्या आचारसंहिता शिथील झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या मत्स्य महाविद्यालयाला पदवी देण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

नामदार तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.परंतु मत्स्य महाविद्यालय नागपूर विद्यापीठाला न जोडता कोकणातच मत्स्य विद्यापीठ निर्माण करणे संदर्भात काहीच आश्वासन मिळाले नाही.आमदार सामंत यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सध्या आमचे प्राधान्य हे विद्यार्थ्यांच्या पदव्या ग्राह्य धरणासंदर्भात आहे असे सांगितले.त्यामुळे मत्स्य महाविद्यालय नागपूर विद्यापीठाला जोडले जाणार की कोकणात वेगळे मत्स्य विद्यापीठ निर्माण केले जाणार याचा संभ्रम कायम आहे .

Related Articles

Back to top button