भाजपकडून उत्तर गोवा लोकसभेसाठी पुन्हा श्रीपाद नाईक यांना उमेदवारी

भारतीय जनता पक्षाचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री व विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्या नावाची घोषणा झाली आहे. आज (दि. 2) दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपची लोकसभेसाठीची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली.त्यात श्रीपाद नाईक यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे नाईक यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही, अशी जी चर्चा सुरू होते त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button