
रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी शिखर संघटनेमार्फत प्रजासत्ताक दिनी लक्षणिक उपोषण
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील अधिसूचना रद्द झालेला प्रकल्प आणायचाच, असा चंग बांधत प्रकल्प समर्थक अधिक आक्रमक झाले आहेत. यासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत रत्नागिरी येथे शिखर संघटनेमार्फत प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मिळण्यासाठी तसेच त्यांचे या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक समर्थकांनी उपोषण करण्याचे ठरवले आहे. या उपोषणाला रत्नागिरी प्रकल्प समर्थक समन्वय समिती राजापूर पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार यांनी दिली.
www.konkantoday.com