
चिपळूण येथे ब्रेक टेस्टिंग ट्रॅकचे काम पूर्णत्वाकडे
चिपळूण -गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या उत्तर रत्नागिरीतील वाहनचालकाच्या मागणीची दखल अखेर पूर्ण होत असून पिंपरी येथे ब्रेक टेस्टिंग ट्रॅकची उभारणी आता पूर्ण झाली आहे .या ट्रॅकची लवकरच आरटीओ व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी होणार आह. यापूर्वी उत्तर रत्नागिरीतील वाहनचालकांना पासिंग करण्यासाठी रत्नागिरीत येण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे मंडणगडच्या टोकापासून खेड दापोली चिपळूण गुहागर या पाच तालुक्यातील वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होत. यासाठी वाहनधारकांनी एकत्रितपणे आवाज उठवत चालक मालक उत्तर रत्नागिरी वाहन संघर्ष समिती तयार करून या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे करण्यात आल. अखेर प्रशासनानेही यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून यासाठी बत्तीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.पिंपरी येथील अडीच एकर जमिनीत हा प्रकल्प उभारण्यात आला असून यासाठी एकशे पन्नास मीटरचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे.