
वाशिष्ठी पुलाला भेग नसून तो प्रसारण सांधा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी पुलाला खालच्या बाजूने भेग गेली असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असताना त्या बाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक प्रसिद्धीपत्रक देत खुलासा करताना पुलाला ती भेग गेलेली नसून तो प्रसारण सांधा असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की परशुराम घाट ते आरवलीदरम्यानच्या चिपळूण टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम परशुराम आरवली हायवेज प्रा. लि. या ठेकेदारामार्फत प्रगतीत आहे. वाशिष्ठी नदीवरील पुलाचे उर्वरित कामही या ठेकेदारामार्फत करण्यात आले. मात्र काही दिवसांपासून वाशिष्ठी पुलाच्या संदर्भात व्हिडिओ क्लीप प्रसारमाध्यमांवर फिरताना दिसत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये उल्लेख केलेल्या पुलाच्या डेस्क स्लॅबच्या खालच्या भागाला भेग गेल्याचे दाखवण्यात आले आहे. त्या बाबतीत खुलासा करण्यात आला असून या भागात भेग गेेलेली नाही. तो प्रसारण सांधा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. www.konkantoday.com