कोकणातील शेती
कोकणात घरा नारळ व मिरीवेल अथवा पानवेल, प्रत्येक झाडा मागे महिना १००० रुपये देऊन जाते. दोन नारळाच्या मध्ये शेवगा आणि मिरिवेल हि पूरक पिके मिळून महिना १५०० रुपये देतात.
आता तुम्हीच ठरवा आपल्या कोकणाच्या घरा भोवती किती जागा आहे आणि तुम्ही किती झाडे लावु शकता..
किमान ५ नारळाची आणी ५ शेवग्याची झाडे नक्किच लावु शकता..म्हणजे प्रती महिना १२५०० रुपये..कोकणातील तरुण मुले १० वी किंवा १२ वी पास झाली किंवा नाही झाली तरी नोकरी साठी पुण्या-मुंबई सारख्या शहरांची वाट धरतात..
एवढा पगार त्यांना नक्किच मिळत नसेल..आणी मिळत असेल तरी देखील..मालकाच्या शिव्या, नाही बस, नाही तर ट्रेनला लटकुन जिवघेणा प्रवास..टपरीवर खाण..बकाल वस्तीत भाडयाने राहणे..
त्या पेक्षा कोकणात स्वःताच्या घरी राहुन मेहनत करुन स्वाभिमानाने मिळवलेल हे उत्त्पन्न
काय कमी आहे का..?
कमी पडत असेल तर झाडाची संख्या वाढवा..
ते शक्य नसेल तर इतर जोड धंदे आहेत ना
१) परसातली शेती..
२ ) पडवितल कुक्कुट पालन
३) पावसाळयातल लाल भोपळा लागवड..
उन्हाळयात करा कलिंगडाची लागवड
४) खास कोकणासाठि जन्माला घातलेल्या “कोकण कनयाळ” शेळी पालन..
५) सौर उर्जेवर चालणारा पाण्याचा पंप…
या सर्व गोष्टि कोकणात घरी राहून करण्या सारख्या आहेत. जो या सर्व गोष्टी करु शकेल त्याची महिन्याची कमाई असेल रुपये ४०,०००/- ते ५०,०००/- च्या बाहेर आणि या पाचातील २ ते ३ गोष्टी करु शकेल तेव्हा त्यांच उत्पन्न असेल दरमहा रुपये १५,०००/- च्या पुढे हे नक्की..
कोकणात पैसा आहे पण तो
दिसत नाही कारण तो रागावुन..रुसुन..लपुन बसला आहे, मला तो दिसतो आहे पण त्याच्या पर्यंत पोहचुन तो आपल्या खिश्यात भरण्यासाठी अनेक मार्ग मला माहित आहे त्या पैकिच हा एक मार्ग पण या मार्गाचे काटेकोर पणे नियोजन करायला हवे हे ही नक्की..कोकणाचा विकास करायचा असेल तर कोकणातली ही य़ुवा,बुध्दी आणी श्रम शक्ति कोकणातच रोखुन धरायला हवी.. रुजवायला हवी.. फुलवायला हवी… तरच कोकण बहरेल आणी तेव्हाच कोकणचा खरया अर्थाने विकास होईल..