
शिवसेना सोडण्यामागचे कारण आत्मचरित्रातून उलगडणार-मा.नारायण राणे
सावंतवाडी, ता.०४:शिवसेना सोडण्याचे कारण नारायण राणे आपल्या आत्मचरित्राच्या माध्यमातून उलगडणार आहेत.आत्मचरित्राच्या माध्यमातून माझ्या जीवनातील अनेक गुपीतं उघड करणार आहे असे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी एका खाजगी वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
नुकतेच नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी माझे वडील नारायण राणे हे आत्मचरित्र लिहीणार आहेत.अब आयेगा मजा, सबका हिसाब होगा असे ट्विट केले होते.त्यामुळे राणेंच्या आत्मचरित्राबाबत उत्सुकता आहे.या पार्श्वभूमीवर राणेंनी आपले म्हणणे मांडले आहे. यात मी शिवसेना का सोडली, उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला याच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या सर्व पक्षातील प्रवास या आत्मचरित्रात मांडणार आहे. हे पुस्तक तयार असून लवकरच याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे असेही राणे म्हणाले.