मांडवी, कोकणकन्याचे दोन डबे होणार कमी; चाकरमान्यांना फटका बसणार

रत्नागिरी ः कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘मांडवी’ आणि ‘कोकणकन्या एक्प्रेस’चे रूपडे बदलणार असून अत्याधुनिक एलएचबी तंत्रज्ञानाचे डबे जोडण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी या दोन्ही गाडयांचे जनरलचे दोन डबे कमी करून कोकण रेल्वेने साध्याभोळया कोकणवासीयांच्या अडचणींत वाढ केली आहे. कमी पैशात दाटीवाटीने जाणार्‍या चाकरमान्यांना गाडीतील आपली जागा शोधण्यासाठी मोठीच कसरत करावी लागणार आहे.

कोकणी प्रवाशांची मदार ही कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाडयांवरच अवलंबून आहे. या दोन्ही गाडयांना असलेले प्रत्येकी चार डबे प्रवाशांना नेहमीच कमी पडतात. मात्र असे असताना दोन्ही गाडयांना अत्याधुनिक डबे जोडताना कोकण रेल्वेने दोन जनरल डबे कमी केले आहेत. त्यामुळे दोन डब्यांवरील ताण वाढणार आहे. १९९७ सालापासून सुरू झालेल्या या दोन गाडयांच्या डबे बदलण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून फक्त चर्चा सुरू होती. तिला आता पूर्णविराम मिळाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले डबे प्रवाशांच्या सेवेत येणार असले तरी चाकरमान्यांना परवडणारे तिकीट आणि सोयिस्कर प्रवास आता त्रासदायक ठरणार आहे. कारण उर्वरित दोन जनरल डब्यांत जागा मिळविताना प्रवाशांचे पुरते हाल होणार आहेत.

Related Articles

Back to top button