कोकण रेल्वेवरील दरडींवर ड्रोनचा वॉच
रत्नागिरी ः कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर या महत्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनार्यावर वसलेल्या कोकण या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील रोहा येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. कोकण हा डोंगर व दर्या व सह्याद्रीच्या पर्वताने नटलेला भाग असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींवर ड्रोनच्या सहाय्याने पाहणी सुरू झाली आहे. दरडग्रस्त पंचवीस ठिकाणांची ड्रोन आणि बुथ लिफ्टच्या सहाय्याने पाहणी केली आहे. केंद्राच्या सुरक्षा समितीकडून मिळालेल्या सुचनांचे पालन केले जात असून १५ जूनपासून पावसाळी गस्त सुरू होईल असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.