कोकणातील मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्याचा घाट

रत्नागिरी ः राज्यातील काही राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मत्स्य महाविद्यालयाशी संबंध नसलेल्या विद्यार्थ्यांमार्फत न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने येत्या १९ वर्षातील सर्व पदव्या अवैध ठरविल्या आहेत. या निर्णयामुळे सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेले मत्स्य महाविद्यालय महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरशी संलग्न करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांसह मच्छिमारांचेही मोठे नुकसान होणार आहे.
शुक्रवारी शिरगांव येथे मत्स्यशास्त्र पदवीधर संघामार्फत पत्रकार परिषद घेवून शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष सुयश पाटील, बहर महाकाळ, मंगेश चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सर्व मत्स्यशास्त्र विषयातील सन २००० पासूनच्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेल्या सर्व पदव्या अवैध ठरविल्या आहेत. त्यामुळे पदव्युत्तर व पीएचडी या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील पहिले मत्स्य महाविद्यालय म्हणून ओळख असलेले शिरगांव येथील मत्स्य महाविद्यालय सन १९८१ मध्ये स्थापन झाले होते.

Related Articles

Back to top button