Cyclone Fani : ‘फनी’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर‘अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलाय का?’ या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट
‘अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलाय का?’ या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट

भुवनेश्वर – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. सध्या भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ 170 ते 200 किलोमीटर प्रतितास वेगानं ओडिशाला धडकणार आहे. ओडिशातील किनारपट्टीलगतच्या 11 जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची भीती असल्याने पुरी, गंजम, गजपती, खुर्दा, जगतसिंहपूर, केंद्रापारा, भाद्रक, जाजपूर, बालासोरा आदी जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासन सज्ज झाले आहे. समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशातील किमान 10 हजार गावे आणि 52 शहरांत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून 11.50 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. निवारा सेंटर्सची उभारणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 81 पथके सज्ज झाली आहेत. आंध्र प्रदेशामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 

Related Articles

Back to top button