
जिल्ह्यात वनक्षेत्रात वाढ
रत्नागिरी ः राज्याचे वनक्षेत्र कमी होत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्रात सन २०१७ ला ७००१६७ हे. वनक्षेत्र होते. त्यामध्ये वाढ झाली असून सध्या ८४३४.४५ हेक्टर वनक्षेत्र आहे. वनक्षेत्र वाढ होणार्या राज्यातील निवडक जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे.
वृक्षतोड करून त्या ठिकाणी टोलेजंगी इमारती बांधल्या जात असल्याने राज्यातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. वृक्षतोड होत नसल्याने वन विभागाकडून सांगण्यात येत असले तरी वन व पर्यावण मंत्रालयाच्या वन परिस्थिती अहवालाच्या आकडेवारीनुसार राज्याचे वनक्षेत्र कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु रत्नागिरी जिल्हा याला अपवाद ठरल्यात दोन वर्षात १४३२.७८ हेक्टर वनक्षेत्रात वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८२०८ चौरस कि.मी. इतके आहे. यामध्ये राखीव वनक्षेत्र ४९१०.३९ हेक्टर आहे.