घरात घुसून महिलेचा विनयभंग
रत्नागिरी ः शेजारच्या घरात झोपलेली असताना तिच्या घराच्या खिडकीतून घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी १ मे रोजी रात्री भोके येथे घडली.
दिनेश रमेश आंबेकर (रा. टेमकरवाडी भोके, रत्नागिरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरूद्ध पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री पिडीत महिला आपल्या लहान मुलासह बेडरूममध्ये झोपलेली असताना दिनेश आंबेकर याने स्लायडिंगच्या खिडकीवाटे तिच्या घरात प्रवेश करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.