कोळोशीतील गुहेत सापडला अश्मयुगीन हत्यारांचा खजिना
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवलीजवळच्या कोळोशी गावात अश्मयुगीन मानवाच्या वास्तव्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. पुरातत्व विभागाने केलेल्या संशोधनात लहान-मोठया आगारातील ६०० हून अधिक अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. त्यामुळे कोकणचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात कोकणचा इतिहास, संस्कृती, परंपरा यांचे वैविध्य आढळते. गड, किल्ले, लेणी, प्रार्थनास्थळे, बंदरे ही येथील समर्थ जीवनाची स्पंदने आहेत. पण नैसर्गिक समृध्दी असूनही कोकणच्या समृध्द इतिहासाची काही पाने दुर्लक्षित राहिली आहेत. येथील पुरातत्व विभाग, विविध संस्था, मंडळे यांच्या संशोधनातून अशा दडलेल्या इतिहासाला उजाळा मिळू लागला आहे.
प्रदीर्घ संशोधनातून रत्नागिरी जिल्हयातील सुमारे ६०० कातळखोद शिल्पांचा ऐतीहासिक खजिना जगासमोर येण्यास मदत झाली. रत्नागिरीतील गुहागरमधील सुसरंडे येथे २००० साली पुरातत्व विभाग, डेक्कन कॉलेजचे डॉ. मराठे यांच्या माध्यमातून उत्खनन झाले होते. त्यावेळी ८० हजार वर्षापूर्वीच्या काही अश्मयुगीन पुराव्यांचे संशोधन झाले होते. त्यापाठोपाठ सिंधुदूर्ग जिल्हयातही प्राचीन शिलावर्तूळांच्या रचना प्रकाशात आल्या. अश्मयुगामध्ये भारतात देखील मानवी वस्ती होती यावर या संशोधनाने शिक्कामोर्तब केले. कणकवली जवळील कोळोशी परिसरातील एक गुहा २०१४ साली संशोधनाच्या पटलावर आली. या गुहेत दडलेले गुढ संशोधनातून पुढे आणण्यासाठी पुरातत्व विभागाने तज्ञांच्या सहाय्याने अभ्यास सुरु केला होता