
दापोलीतून पहिली आंबा पेटी पाठवण्याचा मान सागर मयेकरांना
दापोली तालुक्यातून मुंबई-वाशी मार्केट येथे या हंगामात तालुक्यातून पहिली आंबा पेटी पाठवण्याचा मान हर्णे येथील बागायतदार आणि उद्योजक सागर मयेकर यांनी पटकावला आहे. त्यांनी ३ पेट्या वाशी मार्केटला पाठवल्या असून दोन डझनाच्या प्रत्येक पेटीला ७७०० रुपये दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही त्यांनी हा मान मिळवला आहेे. www.konkantoday.com