चिपळूण नगर परिषद आता झाडांप्रमाणे देणार रस्त्यांना नावे, अनोखा उपक्रम

चिपळूण नगर परिषद आता शहरातील प्रत्येक रस्त्यावर एकाच प्रकारची झाडे लावणार असून त्या झाडाचे नाव त्या रस्त्याला देणार आहे. या अनाख्या उपक्रमांची घोषणा गुरूवारी जागतिक पर्यावरण दिनी करण्यात आली. यावेळी आमदार शेखर निकम, अभिनेता ओंकार भोजने यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेच्यावतीने जलतरण तलाव ते व्ह्यू गॅलरीकडे जाणार्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नगर परिषदेने वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला असून शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर झाडे लावली जाणार आहेत. जलतरण तलाव येथील रस्त्यावर बकुळीची झाडे लावण्यात आली आहेत. अन्य रस्त्यांवर एकच प्रकारची झाडे लावली जातील व ज्या प्रकारची झाडे लावली जातील त्या झडांचे नाव त्या रस्त्याला दिले जाईल, असे सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी वृक्षारोपण उपक्रमाचे कौतूक केले. तसेच वृक्षारोपणासह पर्यावरण रक्षणासाठीच्या उपक्रमासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. अभिनेता ओंकार भोजने यानी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com
देणार रस्त्यांना नावे, अनोखा उपक्रम. चिपळूण नगर परिषद आता शहरातील प्रत्येक रस्त्यावर एकाच प्रकारची झाडे लावणार असून त्या झाडाचे नाव त्या रस्त्याला देणार आहे. या अनाख्या उपक्रमांची घोषणा गुरूवारी जागतिक पर्यावरण दिनी करण्यात आली. यावेळी आमदार शेखर निकम, अभिनेता ओंकार भोजने यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेच्यावतीने जलतरण तलाव ते व्ह्यू गॅलरीकडे जाणार्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नगर परिषदेने वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला असून शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर झाडे लावली जाणार आहेत. जलतरण तलाव येथील रस्त्यावर बकुळीची झाडे लावण्यात आली आहेत. अन्य रस्त्यांवर एकच प्रकारची झाडे लावली जातील व ज्या प्रकारची झाडे लावली जातील त्या झडांचे नाव त्या रस्त्याला दिले जाईल, असे सांगितले.आमदार शेखर निकम यांनी वृक्षारोपण उपक्रमाचे कौतूक केले. तसेच वृक्षारोपणासह पर्यावरण रक्षणासाठीच्या उपक्रमासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. अभिनेता ओंकार भोजने यानी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.www.konkantoday.com