*दहावी, बारावी परीक्षांवरील बहिष्कार स्थगित*

_इयत्ता बारावी व दहावी बोर्ड परीक्षांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे यांनी घातलेला बहिष्कार तात्पुरता स्थगित केला आहे.महामंडळाच्या कार्यकारिणीच्या सभेत परीक्षांवर बहिष्कार घालण्याचे ठरले होते; परंतु शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण सचिव शिक्षण संचालक यांची बालभवन मुंबई येथे शिक्षण संस्था महामंडळाची बैठक आयोजित केली होती.बैठकीत काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्या लवकर पूर्ण करू, असे आश्वासन दिल्यानंतर परीक्षांवर बहिष्कार मागे घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिलीwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button